Samsung Galaxy Fit 3 Launched In India: 13 दिवसांपर्यंतच्या बॅटरी लाइफसह भारतात लॉन्च झाले 'सॅमसंग गॅलॅक्‍सी फिट 3' फिटनेस ट्रॅकर; किंमत आणि वैशिष्ट्य घ्या जाणून

गॅलॅक्‍सी फिट3 वजनाने हलका आणि स्‍लीक आहे.

Samsung Galaxy Fit 3 (PC - X/@ZionsAnvin)

Samsung Galaxy Fit 3 Launched In India: सॅमसंगने आपला नवीन फिटनेस ट्रॅकर 'गॅलेक्सी फिट 3' भारतात लॉन्च केला आहे. यापूर्वी Samsung Galaxy ने Galaxy Fit 2 लाँच केले होते. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. नवीन लाँच केलेल्या फिटनेस ट्रॅकरची किंमत 4,999 रुपये असणार आहे. ग्राहकांना फिटनेस ट्रॅकरग्रे, पिंक गोल्ड आणि सिल्व्हर या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक Samsung अधिकृत वेबसाइट तसेच इतर प्रमुख ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे हा ट्रॅकर खरेदी करु शकतात. वेलनेसच्‍या या नवीन युगामध्‍ये वापरकर्त्‍यांची त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत अधिक सर्वसमावेशक माहिती मिळण्‍याची इच्‍छा आहे आणि सॅमसंग वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या वेलनेस प्रवसामध्‍ये मदत करण्‍यासाठी प्रगत हेल्‍थ मॉनिटरिंग टूल्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक आदित्‍य बाबर यांनी सांगितलं.

गॅलॅक्‍सी फिट 3 अॅल्‍युमिनिअम बॉडी आणि १.6-इंच डिस्‍प्‍लेसह डिझाइन करण्‍यात आले आहे, जे पूर्वीच्‍या मॉडेलपेक्षा 45 टक्‍के मोठे आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना क्षणात सविस्‍तर माहिती तपासणे सुलभ जाते. गॅलॅक्‍सी फिट3 वजनाने हलका आणि स्‍लीक आहे. त्यामुळे तो मनगटावर आरामात फिट बसतो. वापरकर्ते त्‍यांच्‍या जीवनशैलीमध्‍ये गॅलॅक्‍सी फिट३ चा समावेश करू शकतात. या डिवाईसमधील दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी जवळपास 13 दिवस कार्यरत राहू शकते.