आज भारतामध्ये लॉन्च होणार Realme 14x 5G स्मार्टफोन; मिळणार 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी, जाणून घ्या फीचर्स व किंमत

या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर वापरला गेला आहे, जो 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येऊ शकतो. वापरकर्ते 10GB व्हर्च्युअल रॅमचाही लाभ घेऊ शकतात.

Realme 14x 5G Launch Image (Photo Credits: Official Website)

Realme 14x 5G Launch Today in India: जर तुम्हाला नवीन 5G फोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट जवळपास 15 हजार रुपये असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Realme आपला बहुप्रतीक्षित नवीनतम बजेट स्मार्टफोन Realme 14x 5G भारतात आज, म्हणजेच 18 डिसेंबर रोजी लॉन्च करत आहे. फोनची किंमत साधारण 15,000 रुपये असण्याचा अंदाज आहे. या विभागातील हा सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन आहे. आज Realme 14x 5G स्मार्टफोन लॉन्च केला जाईल आणि ई-कॉमर्स फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. क्रिस्टल ब्लॅक, गोल्डन ग्लो आणि ज्वेल रेड या तीन रंगांमध्ये कंपनी हा हँडसेट लॉन्च करत आहे.

या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर वापरला गेला आहे, जो 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येऊ शकतो. वापरकर्ते 10GB व्हर्च्युअल रॅमचाही लाभ घेऊ शकतात. याच्या मदतीने फोन सहज मल्टीटास्क करू शकणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की फोनमध्ये फुल HD+ IPS LCD डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये डुअल कॅमेरा सेटअप असेल. यात 50MP प्राथमिक सेन्सर असू शकतो. मात्र दुसरा सेन्सर कसा असेल याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Realme 14x 5G हँडसेटमध्ये 6,000mAh बॅटरी असू शकते, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. म्हणजेच वापरकर्ते त्यांचा फोन कोणत्याही व्यत्ययाशिवाय बराच काळ वापरू शकतात. (हेही वाचा: Vodafone Idea 5G Launched: व्होडाफोन आयडियाची भारतात 5जी सेवा सुरू, भारतातील 'या' 17 शहरांमध्ये करता येणार वापर)

आज भारतामध्ये लॉन्च होणार Realme 14x 5G स्मार्टफोन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now