Nagpur: पाकिस्तानी ध्वजांच्या कथित विक्रीच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी केली Amazon कार्यालयाची तोडफोड (Watch Video)
कंपनीच्या वेबसाइटवर पाकिस्तानी ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि अशा वस्तू देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून वापरल्या जातात.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानी झेंडे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पुस्तकाच्या विक्रीला विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अॅमेझॉन इंडियाच्या कार्यालयाची तोडफोड केली. शहरातील गणेशपेठ भागातील कंपनीच्या कार्यालयात काही लोकांनी घुसून तोडफोड केल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. Amazon India Limited ला संबोधित केलेल्या आणि स्थानिक मनसे नेते चंदू लाडे आणि विशाल बडगे यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात दावा केला आहे की, कंपनीच्या वेबसाइटवर पाकिस्तानी ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि अशा वस्तू देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून वापरल्या जातात. यासह, भगवद्गीतेची 'अपमानित' करणारे ‘घातक भगवत गीता’ नावाचे पुस्तक अॅमेझॉनवर विकले जात आहे आणि ते प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात यावे, असे पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा: अभिनेते Prakash Raj विरूद्ध Chandrayaan-3 mission च्या खिल्ली उडवणार्या ट्वीट वरून पोलिसांत तक्रार दाखल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)