Modi Govt Generates 12 Lakh Employment: 'मेड इन इंडिया' मोबाईल फोन उत्पादनात 22 पट वाढ; 12 लाख लोकांना मिळाला रोजगार- Minister Ashwini Vaishnav

देशात (मेड इन इंडिया) मोबाईल फोनचे उत्पादन 22 पटीने वाढले आहे. यासोबतच 12 लाख (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) रोजगारही यामुळे निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Ashwini Vaishnav (PC - Facebook)

Modi Govt Generates 12 Lakh Employment: केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी त्यांच्या अधिकृत X खात्यावरून एक पोस्ट करत महत्वाची महिडी शेअर केली. या पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर 'मेड इन इंडिया' उत्पादने देशात तयार होत आहेत. देशात (मेड इन इंडिया) मोबाईल फोनचे उत्पादन 22 पटीने वाढले आहे. यासोबतच 12 लाख (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) रोजगारही यामुळे निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

याआधी अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले होते की, चालू आर्थिक वर्षात भारतात 50 अब्ज डॉलरचे मोबाइल फोनचे उत्पादन होईल. त्यांनी पुढे सांगितले की, या क्षेत्रातील निर्यात 15 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. नजीकच्या भविष्यात देशाची एकूण निर्यात $1 ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे यावरही वैष्णव यांनी भर दिला. भारत चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनली असल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: SBI Hikes Interest Rate: एसबीआयचे कर्ज झाले महाग; गृहकर्ज, वाहन आणि वैयक्तिक कर्जासाठी EMI वाढणार, 'येथे' पहा नवीन व्याजदर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now