Highest Paid Indian IT CEO: एचसीएल टेक्नॉलॉजीजचे C Vijayakumar ठरले सर्वाधिक पगार घेणारे भारतीय आयटी सीईओ, जाणून घ्या काय आहे मानधन

सी विजयकुमार हे सर्वाधिक पगार घेणारे भारतीय आयटी सीइओ बनले आहेत. त्यांच्याकडे आयआयटी पदवी नाही किंवा ते कधीही आयआयएममध्ये गेलेले नाहीत, परंतु सध्याच्या घडीला ते भारतीय आयटी कंपन्यांमध्ये सर्वाधिक पगाराचे सीईओ झाले आहेत.

C Vijayakumar

Highest Paid Indian IT CEO: आयटी क्षेत्रातील दिग्गज एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ सी विजयकुमार हे सर्वाधिक पगार घेणारे भारतीय आयटी सीइओ बनले आहेत. त्यांच्याकडे आयआयटी पदवी नाही किंवा ते कधीही आयआयएममध्ये गेलेले नाहीत, परंतु सध्याच्या घडीला ते भारतीय आयटी कंपन्यांमध्ये सर्वाधिक पगाराचे सीईओ झाले आहेत. नुकतेच 22 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, विजयकुमार हे आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय आयटी कंपन्यांचे सर्वात महागडे सीईओ होते. या कालावधीत त्यांचे पॅकेज वार्षिक आधारावर 190.75 टक्क्यांनी वाढून 84.16 कोटी रुपये झाले.

एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या वार्षिक अहवालानुसार, विजयकुमार यांना $19.6 लाख (सुमारे 16.39 कोटी रुपये) मूळ वेतन आणि $11.4 लाख (सुमारे 9.53 कोटी रुपये) चा परफॉर्मन्स लिंक्ड बोनस मिळाला आहे. उर्वरित रक्कम त्यांना दीर्घकालीन प्रोत्साहन, दीर्घकालीन रोख प्रोत्साहन, लाभ, भत्ते, स्टॉक युनिट्स इत्यादी स्वरूपात देण्यात आली. त्यांचे पॅकेज कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या सरासरी पगाराच्या 707.46 पट आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इन्फोसिसचे सलील पारेख होते, ज्यांचे मानधन 66.25 कोटी रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर विप्रोचे सीईओ श्रीनिवास पल्लिया आहेत, ज्यांना अंदाजे 50 कोटी रुपये मानधन मिळाले होते. (हेही वाचा; Telegram EvilVideo Malware Alert: टेलिग्रामवरून चित्रपट-व्हिडिओ डाउनलोड करणे पडू शकते महागात; मोबाईलमध्ये प्रवेश करू शकते 'इव्हलव्हिडिओ' मालवेअर, हॅकर्सपासून रक्षण करण्यासाठी काही टिप्स)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now