Google Reinstates Indian Apps: गुगलची Play Store वर भारतीय ॲप्स पुनर्संचयित करण्यास सहमती; केंद्रासोबत झालेल्या बैठकीनंतर निघाला तोडगा

यासोबतच, पेमेंटच्या वादग्रस्त समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्टार्टअपसोबत परस्पर करारावर पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचेही म्हटले आहे.

Google Play Store | Representational image (Photo Credits: pixabay)

Google Reinstates Indian Apps: दिग्गज टेक कंपनी गुगलने मंगळवारी (5 मार्च) सांगितले की, ते भारतीय इंटरनेट कंपन्यांचे ॲप्स तात्पुरते पुनर्संचयित करत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज माहिती दिली की, गुगलने प्ले स्टोअरवरून काढून टाकलेले भारतीय ॲप्स पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गुगलने आपल्या प्ले स्टोअरमध्ये भारतीय ॲप्स पुन्हा स्थापित करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच, पेमेंटच्या वादग्रस्त समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्टार्टअपसोबत परस्पर करारावर पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचेही म्हटले आहे. गेल्या आठवड्यात गुगलने Matrimony.com, Naukri.com, Shaadi.com या प्रमुख भारतीय डिजिटल कंपन्यांचे सुमारे डझनभर ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले होते. गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘सहकाराच्या भावनेने, आम्ही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या डेव्हलपर्सचे ॲप्स तात्पुरते पुनर्संचयित करत आहोत.’ (हेही वाचा: Chakshu Portal: सायबर क्राईम मध्ये स्पॅम फोन, SMS, WhatsApp द्वारा फसवणूक करणार्‍यांवर चाप बसवण्यासाठी सरकारकडून नवं चक्षू पोर्टल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)