Google Bans 12 Popular Android Apps: गुगलने Play Store वरून काढून टाकली 12 धोकादायक अॅप्स, जाणून घ्या संपूर्ण यादी

अँड्रॉइड वापरकर्त्यांनाही इशारा दिला आहे की, युजर्सनी ही अॅप्स आपल्या फोनमधून ताबडतोब काढून टाकावीत. हे अॅप्स धोकादायक ठरू शकतील असे गुगलचे म्हणणे आहे.

Play Store (Photo Credits-Twitter)

गुगलने (Google) ने आपल्या प्लेस्टोअर (Playstore) वरून 12 अॅप्स काढून टाकली आहेत. यासह त्यांनी अँड्रॉइड वापरकर्त्यांनाही इशारा दिला आहे की, युजर्सनी ही अॅप्स आपल्या फोनमधून ताबडतोब काढून टाकावीत. हे अॅप्स धोकादायक ठरू शकतील असे गुगलचे म्हणणे आहे. लाखो वेळा डाऊनलोड झालेली ही अॅप्स वापरकर्त्यांना फिटनेस आणि गेमिंग अॅप्सच्या रुपात धोकादायक वेबसाइट्सच्या लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करत आहेत. द एक्सप्रेसमधील एका अहवालानुसार, Golden Hunt, Reflector, Seven Golden Wolf blackjack, Unlimited Score, Big Decisions, Jewel Sea, Lux Fruits Game, Lucky Clover, King Blitz, Lucky Step आणि WalkingJoy अशी ही 12 अॅप्स आहेत. ही अॅप्स अनेक मार्गांनी लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement