Elon Musk’s xAI Hiring AI Tutors From India: एलॉन मस्कची कंपनी एक्स एआयमध्ये काम करण्याची संधी; भारतामधून केली जात आहे हिंदी ट्यूटरची भरती, जाणून घ्या पगार
हा डेटा एआयच्या प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. जेणेकरून त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजेल.
Elon Musk’s xAI Hiring AI Tutors From India: अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI भारतामधून हिंदी ट्यूटरची नोकरभरती करत आहे. या नोकरीत घरी बसून चांगले पैसे कमावण्याची संधी आहे. कंपनी या नोकरीत दर तासाला $35 ते $65 (रु. 2,900 ते 5,500) पगार देईल. लिंक्डइनला भेट देऊन या नोकरीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. लिंक्डइनवर नोकरीची सर्व माहिती देण्यात आलेली आहे. माहितीनुसार, या नोकरीसाठी कोणत्याही विशेष तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही. जर तुमचे हिंदीवर आणि इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असेल आणि चांगले संशोधन कौशल्य असेल तर ही तुमची स्वप्नवत नोकरी असू शकते. हिंदी व्यतिरिक्त, कंपनी इंग्रजी, चीनी, रशियन आणि स्पॅनिश भाषिकांना नोकरीच्या संधी देखील देत आहे.
कंपनीने सांगितले आहे की, या जॉबमध्ये तुम्हाला एआयला फिल्टर केलेला आणि लेबल केलेला डेटा द्यावा लागेल. हा डेटा एआयच्या प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. जेणेकरून त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. डेटा गोळा करण्याबरोबरच त्याचे आयोजनही करावे लागेल. xAI हा एलोन मस्कचा एआय चॅटबॉट आहे. हे पूर्णपणे चॅट जीपीटी आणि गुगल जेमिनी (Google Gemini) सारखे कार्य करते. याच्या मदतीने कोणत्याही गोष्टीचे उत्तर क्षणार्धात मिळू शकते. चॅटजीपीटीच्या टीकेनंतर कंपनीने 2023 मध्ये हा चॅटबॉट लॉन्च केला होता. (हेही वाचा: 'Game of Thrones' चॅटबॉट सोबत जुळलं भावनिक नातं, 14 वर्षीय मुलाने केली आत्महत्या; आईने Character.AI ला खेचलं कोर्टात)
Elon Musk’s xAI Hiring AI Tutors From India:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)