Elon Musk: एलॉन मस्क पुन्हा एकदा बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

एलॉन मस्कच्या टेस्ला इंकच्या स्टॉकमध्ये जवळजवळ 70% ने वाढ झाली आहे.

Elon Musk

टेस्लाचे (Tesla) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्टला (Bernard Arnault) मागे टाकत त्यांनी हे स्थान पटकावले. ट्विटर (Twitter) डील आणि टेस्ला शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यामुळे एलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी घट झाली होती. यामुळे तो जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. मात्र, आता त्याने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. या वर्षी, मस्कच्या संपत्तीमध्ये टेस्ला इंकच्या स्टॉकमध्ये जवळजवळ 70% ने वाढ झाली आहे. यासह, टेस्लाच्या अनेक मॉडेल्सच्या कारच्या किमती कमी केल्यानंतर, कंपनीला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उच्च मागणीचा फायदा देखील मिळाला आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now