Damini Lightning Alert App: पृथ्वी मंत्रालयाने तयार केले ‘दामिनी’ अॅप; पावसाळ्यात वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी दर्शवणार स्थिती

‘दामिनी’ अॅप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन केले आहे

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मान्सून कालावधीत वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले ‘दामिनी’ अॅप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन केले आहे. हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. दामिनी ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते. अॅपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थालंतरीत व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement