Cyber Attacks in 2024: सायबर गुन्हेगार 2024 मध्ये करू शकतात AI शी निगडीत हल्ले, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती

संशोधकांनी नमूद केले की, सायबर गुन्हेगारांनी त्यांचे हल्ले वाढवण्यासाठी मशीन लर्निंग आणि जनरेटिव्ह एआयच्या क्षमतेचा फायदा घेणे अपेक्षित आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

यावर्षी जगाने अनेक मोठे सायबर हल्ले पाहिले. आता शुक्रवारी समोर आलेल्या एका नवीन अहवालात 2024 मधील संभाव्य सायबर गुन्ह्यांबाबत मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये सायबर गुन्हेगार हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शी निगडीत हल्ले करू शकतात. तसेच रॅन्समवेअर मोहिमा आणि आयडेंटीटी अॅटॅकवरही (Identity Attacks) ते लक्ष केंद्रित करू शकतात. या प्रकारच्या हल्ल्यात, सायबर गुन्हेगार एखाद्या व्यक्तीचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, डोमेन नेम, वैयक्तिक डेटा किंवा डिजिटल प्रमाणपत्रे यासारख्या ओळखीशी संबंधित माहिती चोरण्याचा, बदलण्याचा आणि त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात. बॅराकुडा नेटवर्क (Barracuda Network) नुसार, जसजसे 2024 जवळ येत आहे तसतसे AI-सक्षम सायबर हल्ल्यांचा धोका ही कंपन्यांसमोरील मोठी समस्या बनली आहे.

संशोधकांनी नमूद केले की, सायबर गुन्हेगारांनी त्यांचे हल्ले वाढवण्यासाठी मशीन लर्निंग आणि जनरेटिव्ह एआयच्या क्षमतेचा फायदा घेणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रगत AI अल्गोरिदमद्वारे आक्रमण प्रक्रियेचे ऑटोमेशन समाविष्ट असू शकते, ज्यामुळे अधिक कार्यक्षम, स्केलेबल आणि गुंतागुंतीचे हल्ले होऊ शकतात. शिवाय, अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, तंत्रज्ञानातील प्रगती, भू-राजकीय घटना आणि हल्लेखोरांच्या डावपेचांमधील बदलांमुळे नवीन धोके निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये डीपफेक आणि सिंथेटिक मीडिया हल्ल्यांच्या संभाव्य वाढीचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now