IPL Auction 2025 Live

Cyber-Crime And Financial Frauds: सायबर गुन्हे-आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी DoT चा मोठा निर्णय; 28,200 मोबाइल हँडसेट होणार ब्लॉक, 20 लाख क्रमांकांची पुनःपडताळणी

दूरसंचार विभाग, गृह मंत्रालय आणि राज्य पोलीस, सायबर-गुन्हे तसेच आर्थिक फसवणुकीमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी एकत्र आले आहेत.

Mobile Phone PC- Pixabay

Cyber-Crime And Financial Frauds: गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांनी केलेल्या विश्लेषणात सायबर गुन्ह्यांमध्ये 28,200 मोबाईल हँडसेटचा गैरवापर करण्यात आल्याचे आढळून आले आहे.  दूरसंचार विभागाने यापुढे जाऊन केलेल्या विश्लेषणात या मोबाइल हँडसेटमध्ये तब्बल 20 लाख दूरध्वनी क्रमांक वापरले गेले असल्याचे आढळले आहे. या विश्लेषणानंतर, दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना 28,200 मोबाइल हँडसेट ब्लॉक करण्याचे आणि या मोबाइल हँडसेटशी जोडलेल्या 20 लाख मोबाइल क्रमांकांची तात्काळ पुनर्पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुनर्पडताळणी अयशस्वी ठरल्यास त्या दूरध्वनी क्रमांकांची सेवा तत्काळ खंडित करण्याचे निर्देशही दूरसंचार सेवा प्रदात्यांना दिले आहेत.

अशाप्रकारे दूरसंचार विभाग, गृह मंत्रालय आणि राज्य पोलीस, सायबर-गुन्हे तसेच आर्थिक फसवणुकीमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. फसवणूक करणाऱ्यांचे जाळे नष्ट करणे आणि डिजिटल धोक्यांपासून नागरिकांचे संरक्षण करणे हा या सहयोगी प्रयत्नाचा मुख्य उद्देश आहे. हा सर्वसमावेशी दृष्टीकोन सार्वजनिक सुरक्षेसाठी तसेच सुरक्षित डिजिटल वातावरण सुनिश्चित करण्यासाठीच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रदर्शन करतो. (हेही वाचा: Google Wallet App Launch: भारतात अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी 'गुगल वॉलेट' ॲप लॉन्च, 20 ब्रँड्सशी करार; नेमका उपयोग काय?)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)