Digital Payment: भारत-सिंगापूरमधील डिजिटल व्यवहार अधिक सोपे होणार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत UPI-PayNow पेमेंट कनेक्टिव्हिटी लाँच होणार
आता सिंगापूरमधल्या भारतीयांना सिंगापूरमधून भारतात आणि भारतातून सिंगापूरमध्ये तात्काळ आणि कमी खर्चात पैसे हस्तांतरित करता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग (Lee Hsien Loong) हे आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारताचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरचे पे नाऊ (PayNow) दरम्यान क्रॉस-बॉर्डर कनेक्टिव्हिटीचा प्रारंभ करतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI) शक्तिकांत दास (Shaktikant Das) आणि मॉनेटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूरचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन (Ravi Menon) यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ होईल. या दोन पेमेंट व्यवस्थांच्या जोडणीमुळे दोन्ही देशांतील रहिवाशांना सीमेपलीकडून पैशाचे जलद आणि किफायतशीर हस्तांतरण (Digital Money Transfer) करता येईल. यामुळे सिंगापूरमधील भारतीय समुदायाला विशेषत: स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थ्यांना सिंगापूरमधून भारतात आणि भारतातून सिंगापूरमध्ये तात्काळ आणि कमी खर्चात पैसे हस्तांतरित करता येतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)