Changes in Twitter: आता भारतीय सरकारी खाती, कंपन्या, सार्वजनिक व्यक्तींच्या हँडलवर दिसू लागले 'Official' लेबल

नवीन बदलानंतर, अशी Official लेबले अधिकृत सरकार, कंपन्या, व्यावसायिक भागीदार, प्रमुख मीडिया आउटलेट्स, प्रकाशक आणि काही इतर सार्वजनिक व्यक्तींच्या खात्यांवर दिसतील.

Twitter logo (Photo courtesy: Twitter)

एलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यापासून व्यासपिठाबाबत अनेक नवे बदल सुरु आहेत. ब्लू टिकसाठी पैसे आकारण्यात येणार असल्याच्या माहितीनंतर आता, सर्व ट्विटर वापरकर्त्यांना ट्विटर वापरण्यासाठी देखील पैसे मोजावे लागतील असे काही अहवालांमध्ये म्हटले आहे. अशात ट्विटरमध्ये अधिकृतपणे काही बदल दिसणे सुरू झाले आहेत. व्यासपीठावर जे हँडल्स अधिकृत आहेत, त्यांच्या खाली ‘Official’ असे लेबल दिले जात आहे. अशी Official लेबले अधिकृत सरकार, कंपन्या, व्यावसायिक भागीदार, प्रमुख मीडिया आउटलेट्स, प्रकाशक आणि काही इतर सार्वजनिक व्यक्तींच्या खात्यांवर दिसतील. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन लाँच झाल्यावर लेबलिंग सुरू होईल. मात्र भारतामध्ये सरकारी खाती, कंपन्या, सार्वजनिक व्यक्तींच्या हँडलवर Official लेबल दिसू लागले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह, राहुल गांधी ममता बॅनर्जी यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही 'अधिकृत' लेबल दिसत आहे.

Not all previously verified accounts will get the “Official” label and the label is not available for purchase. Accounts that will receive it include government accounts, commercial companies, business partners, major media outlets, publishers and some public figures.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now