Pro-Khalistan 6 YouTube Channels Blocked: खलिस्तान समर्थक सामग्री प्रसारित करणाऱ्या 6 यूट्यूब चॅनेलवर केंद्राची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व यूट्यूब चॅनेल खलिस्तान समर्थक सामग्री प्रसारित करत होते, त्यामुळेच त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी याला दुजोरा दिला आहे.
मोदी सरकारने पुन्हा एकदा देशविरोधी सामग्री प्रसारित करणाऱ्या 6 यूट्यूब चॅनेलवर ताबा मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व यूट्यूब चॅनेल खलिस्तान समर्थक सामग्री प्रसारित करत होते, त्यामुळेच त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी याला दुजोरा दिला आहे. अपूर्व चंद्रा यांनी शुक्रवारी सांगितले, खलिस्तान समर्थक भावनांना प्रोत्साहन देणारी किमान सहा YouTube चॅनेल सरकारच्या आदेशानुसार ब्लॉक करण्यात आली आहेत.
ते म्हणाले, गेल्या 10 दिवसांत परदेशातून चालवलेले सहा ते आठ YouTube चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत. या वाहिन्या पंजाबी भाषेत असून पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यात संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा Data Broker Breaches: तब्बल 1.8 कोटी पेक्षा जास्त भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती डेटा ब्रोकर उल्लंघनद्वारे झाली उघड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)