BSNL: बीएसएनएलसाठी 1 लाख 64 हजार कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंत्रिमंडळाची मंजुरी
4G सेवांच्या विस्तारात मदत करण्यासाठी सरकार बीएसएनएलला स्पेक्ट्रम वाटप करेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या पुनरुज्जीवनासाठी एक लाख 64 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की 4G सेवांच्या विस्तारात मदत करण्यासाठी सरकार बीएसएनएलला स्पेक्ट्रम वाटप करेल. बीएसएनएलची 33,000 कोटी रुपयांची वैधानिक देणी इक्विटीमध्ये रूपांतरित केली जातील. तसेच, कंपनी 33,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज फेडण्यासाठी बाँड जारी करेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)