Apple Event 2024 Live Streaming: ॲपल कंपनीचा बहुप्रतीक्षित वार्षिक इव्हेंट सुरु; लवकरच लाँच होणार iPhone 16 सिरीज, पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
या कार्यक्रमात Apple ने आपली Apple Watch Series 10 अनेक खास फीचर्ससह लॉन्च केली आहे. हे घड्याळ तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आणले गेले आहे.
Apple Event 2024 Live: बहुप्रतीक्षित असा Apple चा ग्लोटाइम इव्हेंट सुरु झाला आहे. हा कंपनीचा वार्षिक कार्यक्रम असतो, ज्यामध्ये कंपनी विविध नवीन उत्पादने सादर करते. या कार्यक्रमात Apple ने आपली Apple Watch Series 10 अनेक खास फीचर्ससह लॉन्च केली आहे. हे घड्याळ तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आणले गेले आहे. या इव्हेंटमध्ये लवकरच एआय फीचर्ससह आयफोन 16 सिरीज सादर केली जाईल. आयफोन 16 मालिकेत आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स हे चार मॉडेल लॉन्च केले जातील. मालिकेच्या प्रो मॉडेल्समध्ये डिस्प्ले आणि बॅटरीचा आकार मोठा असण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमात नवीन AirPods देखील लॉन्च करण्यात आले आहेत. ऍपलचा इट्स ग्लोटाइम इव्हेंट क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील ऍपल पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. (हेही वाचा: World’s largest iPhone: जगातील सर्वात मोठा आयफोन, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; भारतीय वंशाच्या ब्रिटीश यूट्यूबरची कमाल)
या ठिकाणी पहा Apple च्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)