आयपीयलमधून वेळ काढत विराट कोहली आणि पत्नी अनुष्काने खेळला 'पिकलबॉल'; दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड सहभागी

भारतात सध्या आयपीएल जोरदार सुरू आहे. त्यातही वेळ काढत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी पिकलबॉल खेळ खेळला. त्यात त्यांच्यासोबत दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड सहभाग नोंदवला.

PC-X

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आरसीबीने आयपीएल 2025 (Indian Premier League) च्या प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. विराट आयपीयलच्या सराव सामन्यातील ऑफ वेळेत पत्नी अनुष्का शर्मासोबत पिकलबॉल (Pickleball) खेळताना दिसला. पिकलबॉल खेळ अनेक भारतीयांनी खेळलाही नसेल. मात्र, हा टेनिससारख्याच शैलीतला आहे. आरसीबी संघ ज्या हॉटेलमध्ये राहत आहे त्याच हॉटेलमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पिकलबॉल खेळले. अनुष्का आणि विराट () हे दोघेही एक टीम म्हणून हा गेम खेळताना दिसले. तर त्यांचा विरोधी टीम दिनेश कार्तिक (Dinesh Karthik and Dipika Pallikal) आणि त्याची पत्नी दिसले. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड हे देखील दिसले. आरसीबीने त्यांच्या इंस्टाग्रामवर पिकलबॉल खेळतानाचे सर्व फोटो शेअर केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement