ACC U-19 Asia Cup 2021: उद्या अंडर-19 आशिया चषकाचा भारत विरुद्ध UAE सामना रंगणार, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक
भारत 23 डिसेंबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
बीसीसीआयने यूएईमध्ये 23 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. T20 विश्वचषकानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. भारत 23 डिसेंबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 23 तारखेला भारत विरुद्ध UAE सामना रंगणार आहे. तर, 25 डिसेंबर रोजी पाकिस्तान विरुद्धचा सर्वोच्च व्होल्टेज सामना खेळवला जाईल. तसेच 27 डिसेंबरला भारत विरुद्ध अफगाणिस्थानमध्ये सामना होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 1 जानेवारी रोजी होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)