Shreyas Iyer: श्रेयस अय्यर पाहायचा 'तिच्या' मेसेजची वाट, पण ती कोण? कपिलच्या शोमध्ये सांगितली खास आठवण

त्यावेळी श्रेयसनं त्याच्या पहिल्या आयपीएलमधील फॅन क्रशविषयी खुलासे केले आहेत. तिच्या एका मॅसेजची तो किती आतूरतेने वाट पाहत होता आणि त्यातून तो कसा निराश झाला हे त्याने सांगितले आहे.

Photo Credit - Instagram

The Great Indian Kapil Show Shreyas Iyer : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'(The Great Indian Kapil Show)मध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)नं सांगितलं की त्याच्या पहिल्या आयपीएल दरम्यान, त्याची नजर एका सुंदर मुलीवर पडली होती. तिला पाहून श्रेयसनं हात हलवत तिला हॅलो म्हटलं होत. पुढे श्रेयस म्हटला की,  'मॅचसंपल्यानंतर ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटलं. त्यामुळे मी फेसबूकवर तिच्या मेसेजची वाट पाहत होतो आणि मी फेसबूकवर सतत चेक करायचो की तिचा मेसेज आलाय का? त्या नंतर मी अशा कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही', असे श्रेयस म्हणाला. यावेळी शोमध्ये रोहित शर्मा( rohit sharma)ची पत्नी रितिका (Ritika) देखील होती. कपिलनं तिलादेखील प्रश्न विचारला 'अनुष्कासोबत मॅच बघतेस तेव्हा ते दोघी कोणत्या गोष्टीवर चर्चा करतात?' त्यावर उत्तर देत रितिका म्हणाली की, जेव्हा रोहित खेळत असतो तेव्हा ती शांत बसते, काही बोलत नाही. (हेही वाचा :The Great Indian Kapil Show मध्ये Rohit Sharm आणि Shreyas Iyer केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरत येणार नाही )

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif