Surya Kumar Yadav On Virat Kohli: मानला रे भाऊ... टीम इंडियाच्या विजयानंतर विराट कोहलीसाठी सुर्यकुमारचे खास ट्विट

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 160 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. विराट कोहलीने तुफानी कामगिरी केली.

Virat Kohli

T20 विश्वचषक 2022 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना विजयाची भेट दिली आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 160 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. विराट कोहलीने तुफानी कामगिरी केली. त्याने 82 धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर सर्व स्तरातून टीम इंडियाचे कौतुक होत आहे. दरम्यान टीम इंडियाचा खेळाडू सुर्यकुमार यादव याने विराट कोहलीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणाला, मानला रे भाऊ. असे त्याने लिहिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now