INDvsSA ODI: भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, पहा कोणाला मिळाली जागा
संघाची कमान टेंबा बावुमाकडे असेल, तर नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने संघ जाहीर केला आहे. संघाची कमान टेंबा बावुमाकडे असेल, तर नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने 17 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये सर्वात खास नाव आहे ते 21 वर्षीय वेगवान गोलंदाज मार्को यान्सनचे. मात्र, आफ्रिकन संघालाही कसोटी मालिकेपूर्वी दुखापत झालेला आपला वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाशिवाय या मालिकेत मैदानात उतरावे लागणार आहे.
आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, यानामन मालन, झुबेर हमजा, मार्को यान्सन, सिसांडा मंगला, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, अँडील फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागीसो , तबरेझ शम्बाडा , रासी व्हॅन डर डुसेन, काइल वेरेन.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)