Shoaib Akhtar On Pak Selection: रावळपिंडी एक्सप्रेस कॅप्टन बाबर आझम आणि प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांच्यावर भडकला शोएब अख्तर, केली 'ही' मोठी भविष्यवाणी

आशिया कपमध्ये फ्लॉप ठरलेल्या फखर जमानला 15 जणांच्या संघात स्थान मिळाले नाही.

शोएब अख्तर (Photo Credit: Instagram)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या 2022 T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. आशिया कपमध्ये फ्लॉप ठरलेल्या फखर जमानला 15 जणांच्या संघात स्थान मिळाले नाही. मात्र, तो राखीव खेळाडू म्हणून संघाशी जोडला जाईल. याशिवाय मोहम्मद हरीस आणि शाहनवाज डहानी हेही राखीव खेळाडू म्हणून संघात सहभागी होणार आहेत.  दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर असलेला स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने वर्ल्डकप संघात पुनरागमन केले आहे. मात्र या संघनिवडीवर शोएब अख्तरने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने व्हिडिओ पोस्ट करत बाबर आझम आणि प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांच्यावर भडकला आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)