IND Vs WI: पत्रकार झालेल्या रोहित शर्माने अजिंक्य रहाणेचा घेतला धम्माल इंटरव्यू (Watch Video)
बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर हा धम्माल व्हिडिओ शेअर केला असून प्रेक्षकांनी देखील यावर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ यासाठी तयारी करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा रिपोर्टरच्या भूमिकेत दिसत आहे आणि तो संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची मुलाखत घेत आहे. रोहित शर्माने रहाणेला विचारले की, तू अनेकदा वेस्ट इंडिजला आला आहेस, तू या विकेट्सवर खूप खेळला आहेस, खूप धावा केल्या आहेत, आलेल्या नवीन मुलांना काय सांगायचे आहे, याला उत्तर देताना रहाणे म्हणाला, वेस्ट इंडीज इंडीज माझा प्रत्येकासाठी संदेश आहे, इथल्या विकेट्सवर आरामात खेळा. रोहितने क्रिकेटर्सच्या मैदानावर लक्ष केंद्रित करण्याशी संबंधित पुढील प्रश्न विचारला पण तेवढ्यात पाऊस सुरु झाला.
पाहा व्हिडिओ -