Serena Williams Announces Retirement: जगप्रसिद्ध टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने केले निवृत्तीची घोषणा

सेरेनाने यंदाच्या विम्बल्डन ओपनमध्ये प्रवेश केला होता, पण पहिल्याच फेरीत ती बाहेर पडली होती.

Serena Williams Announces Retirement: जगप्रसिद्ध टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने केले निवृत्तीची घोषणा
Serena Williams (संग्रहित संपादित प्रतिमा)

23 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्सने निवृत्ती जाहीर केली आहे. वोगच्या सप्टेंबरच्या अंकाच्या मुखपृष्ठावर दिसल्यानंतर, टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या निवृत्तीची घोषणा केली. सेरेना विल्यम्सने सांगितले की, ती वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा यूएस ओपननंतर टेनिसला अलविदा करणार आहे. सेरेनाने 1999 मध्ये पहिल्यांदा यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.

सेरेनाने यंदाच्या विम्बल्डन ओपनमध्ये प्रवेश केला होता, पण पहिल्याच फेरीत ती बाहेर पडली होती. सेरेना विल्यम्सने तिच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत लिहिले, 'आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करता तेव्हा त्या वेळी असा निर्णय घेणे कठीण असते. मी टेनिसचा आनंद घेतला. मात्र आता माझ्या आईपणावर, माझ्या अध्यात्मिक ध्येयांवर आणि शेवटी माझ्या वेगळ्या, पण तितक्याच रोमांचक 'सेरेना' शोधावर लक्ष केंद्रित करायचे आहे.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement