World Cadets Wrestling Championships 2022: जागतिक कॅडेट्स कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुरजने जिंकले सुवर्ण पदक
तो गेल्या 32 वर्षात भारताचा पहिला GR अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे.
सध्या जागतिक कॅडेट्स कुस्ती चॅम्पियनशिप 2022 ही एकत्रित स्पर्धांची जागतिक कॅडेट्स कुस्ती स्पर्धा सुरु आहे. दिनांक 25 ते 31 जुलै या कालावधीत रोम, इटली या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय स्पर्धकाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 2022 वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये ग्रीको-रोमन (GR) 55kg स्पर्धेत सूरजने सुवर्णपदक जिंकले आहे. अशाप्रकारे तो गेल्या 32 वर्षात भारताचा पहिला GR अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. भारताचा पप्पू यादव 1990 मध्ये शेवटचा अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियन होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)