Wimbledon 2022: रशिया आणि बेलारूस खेळाडूंवर विम्बल्डनमध्ये बंदी, युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानिषेधार्त निर्णय; डॅनिल मेदवेदेवसह अनेक दिग्गज बाहेर

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विम्बल्डनचे आयोजक AELTC ने 27 जून ते 10 जुलै दरम्यान होणाऱ्या ग्रँड स्लॅममधून रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घातली आहे. विम्बल्डनचे आयोजक ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने सांगितले की ते ‘शक्‍यतम मार्गाने रशियाचा जागतिक प्रभाव मर्यादित करण्यासाठी’ काम करत आहेत.

डॅनिल मेदवेदेव (Photo Credit: Instagram)

पुरुष जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू रशियाचा डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev), जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेला आंद्रे रुबलेव आणि चौथ्या क्रमांकाची बेलारूसची महिला टेनिसपटू आर्यन सबालेन्का (Aryna Sabalenka) जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम विम्बल्डनला (Wimbledon) मुकणार आहेत. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विम्बल्डनचे आयोजक ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने 27 जून ते 10 जुलै या कालावधीत होणाऱ्या ग्रँड स्लॅममधून रशिया आणि बेलारूसच्या टेनिसपटूंवर बंदी घातली आहे. आयोजकांनी हा निर्णय घेतला असून ते लवकरच जाहीर करण्याचा दावा ब्रिटीश माध्यमांनी केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now