Vinesh Phogat To Return Awards: महिला कुस्तीपटू विनेश फोगट परत करणार 'खेलरत्न' आणि 'अर्जुन पुरस्कार'; पीएम मोदींना लिहिले पत्र

विनेशच्या आधी बजरंग पुनियानेही असाच पद्मश्री पुरस्कार परत केला होता. त्याचबरोबर साक्षी मलिकनेही कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.

Vinesh Phogat (PC - ANI/Twitter)

महिला कुस्तीपटू विनेश फोगटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने लिहिले, ‘मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे.’ यासोबतच तिने पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राचा फोटोही शेअर केला आहे. विनेश फोगटला 2016 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. खेलरत्न हा भारतातील कोणत्याही खेळाडूला मिळू शकणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे. विनेशच्या आधी बजरंग पुनियानेही असाच पद्मश्री पुरस्कार परत केला होता. त्याचबरोबर साक्षी मलिकनेही कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.

भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक 21 डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये संजय सिंह या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर साक्षी मलिकने कुस्तीतून संन्यास घेत म्हटले होते की, ब्रिजभूषण सारख्या व्यक्तीची पुन्हा निवड झाली तर काय करायचे? यानंतर बजरंगने पद्मश्री परत केला आणि आता विनेशने तिचा खेलरत्न परत केला आहे. (हेही वाचा: Newly Elected WFI Suspend: केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित मंडळाला केले निलंबित)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

RCB vs KKR T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात बंगळुरू विरुद्ध कोलकाताची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर

GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement