Vinesh Phogat Disqualification Case: विनेश फोगाटच्या अपात्रेचा निर्णय पुन्हा लांबणीवर ; आता 16 पर्यंत पहावी लागणार वाट

विनेशला सुवर्णपदकाच्या लढतीत अतिरिक्त वजनामुळे बाहेर पडावे लागले. सकाळी तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.

Vinesh Phogat । X

कुस्तीपटू विनेश फोगटसह (Vinesh Phogat) संपूर्ण देश पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) मधील अपात्रतेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने (CAS) सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आता 16 ऑगस्ट स्थानिक वेळ 6 वाजता या प्रकरणाचा निकाल देऊ असे सांगितले आहे.   6 ऑगस्टला जपानच्या युई सुसाकीविरुद्धच्या विजयासह विनेशने सलग तीन विजय मिळवत महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now