Vinesh Phogat Retires: 'कुस्ती जिंकली, मी हरले आता माझ्यात ताकद नाही'; विनेश फोगाट ने भावनिक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती
तुमचं स्वप्न माझी हिंमत तुटली आहे. यापेक्षा जास्त माझ्यात ताकद नाही. अलविदा कुस्ती' अशी भावूक पोस्ट लिहित तिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
Vinesh Phogat चं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न भंगल्यानंतर तिने निवृत्ती जाहीर केली आहे. 50 किलो वजनी गटामध्ये 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला स्पर्धेतून काढून टाकण्यात आले आटोकाठ प्रयत्न करून देखील वजन कमी करू न शकल्याने डिहायड्रेट होऊन ती कोसळली. विनेशने त्यानंतर आता X वर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. 'आई कुस्ती माझ्याविरूद्ध जिंकली. तुमचं स्वप्न माझी हिंमत तुटली आहे. यापेक्षा जास्त माझ्यात ताकद नाही. अलविदा कुस्ती' अशी भावूक पोस्ट लिहित तिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. IOA On Vinesh Phogat's Disqualification: विनेश फोगट हिच्या अपात्रेचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून निषेध; मनसूख मांडीवय यांचे लोकसभेत निवेदन.
विनेश फोगाट ची निवृत्ती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)