Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकमध्ये दिल्लीतील सुवर्णपदक विजेत्यांना केजरीवाल सरकारकडून 3 कोटींचे बक्षीस जाहीर

तसेच रौप्य पदक जिंकणाऱ्यांना 2 कोटी आणि ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिल्ली सरकारकडून दिले जाईल.

टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: Getty)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने  (Delhi Government) ऑलिम्पिक (Olympics) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या राजधानी दिल्लीच्या खेळाडूंसाठी 3 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच रौप्य पदक जिंकणाऱ्यांना 2 कोटी आणि ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिल्ली सरकारकडून दिले जाईल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीतील 4 खेळाडूंची निवड झाली असून यामध्ये दीपक कुमार (Deepak Kumar), मनिका बत्रा (Manika Batra), अमोज जेकब, आणि सार्थक भांबरी यांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)