65th Maharashtra Kesari Time Table: धाराशिवमध्ये आजपासून रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार, एका क्लिकवर पाहून घ्या स्पर्धेची कार्यक्रर्म पत्रिका

तुळजाभवानी क्रीडा संकुलात जंगी कुस्त्यांचा फड पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी राज्यभरातून 950 मल्ल व 550 पंच दाखल झाले आहेत. माती आणि गादीवरील कुस्ती स्पर्धेत नामवंत मल्लांचे शड्डू संकुलात घुमणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून (शुक्रवार) 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुलात जंगी कुस्त्यांचा फड पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी राज्यभरातून 950 मल्ल व 550 पंच दाखल झाले आहेत. माती आणि गादीवरील कुस्ती स्पर्धेत नामवंत मल्लांचे शड्डू संकुलात घुमणार आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती तर अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण आणि स्पर्धेचा समारोप होणार आहे. दरम्यान 16 ते 20 महाराष्ट्र केसरी' स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका पाहुन घ्या..

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now