WFI Election 2023: भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका 11 जुलै रोजी होणार, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय
यावेळी सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे असतील, कारण स्पर्धा चुरशीची होणार म्हणून नाही तर WFI चे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यामुळे खूप चर्चेत आहे.
भारतीय कुस्ती महासंघ (WFI Election 2023) च्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही निवडणूक 11 जुलै रोजी होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे असतील, कारण स्पर्धा चुरशीची होणार म्हणून नाही तर WFI चे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यामुळे खूप चर्चेत आहे. देशातील सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दुसरीकडे विनेश फोगट, साक्षी मलिकसह प्रसिद्ध कुस्तीपटू ब्रिज भूषणच्या अटकेविरोधात सातत्याने आंदोलन करत होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)