Telangana: बॅडमिंटन खेळताना 38 वर्षीय व्यक्ती कोसळा, हृदयविकाराच्या झकट्याने जागेवरच मृत्यू

श्याम यादव (Shyam Yadav) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली. बॅडमिंटन खेळत असताना हा व्यक्ती जमिनीवर अचानक कोसळला. पोलिसांनीही या घटनेची पुष्टी केली आहे.

Shyam Yadav | (Photo Credits: Twitter)

हैदराबाद येथील लालपेट डियममध्ये बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. श्याम यादव (Shyam Yadav) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली. बॅडमिंटन खेळत असताना हा व्यक्ती जमिनीवर अचानक कोसळला. पोलिसांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. शाम यादव यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयातून परतल्यानंतर शाम नियमितपणे बॅडमिंटन खेळत असत. कालही तो नित्यक्रमानुसार स्टेडियमवर गेले होता. बॅडमिंटन खेळत असतानाच ते कोसळले आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना गांधी रुग्णालयात हलवण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)