How To Watch IND vs PAK, Asian Champions Trophy 2023 Free Live Streaming: आज होणार टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हॉकीचा जबरदस्त सामना, येथे जाणून घ्या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण
भारताने सोमवारी गतविजेत्या दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्याआधी भारताने मलेशियाविरुद्ध 5-0 असा विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर रात्री 8.30 वाजता सुरू होईल.
IND vs PAK: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy 2023) आज भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारताने सोमवारी गतविजेत्या दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्याआधी भारताने मलेशियाविरुद्ध 5-0 असा विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर रात्री 8.30 वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या लढतीचे प्रसारण हक्क आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 सामन्याचे स्टार स्पोर्ट्स फर्स्ट आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. चाहते फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर हॉकी सामन्याचे थेट प्रवाह पाहू शकतात.