Swapnil Kusale Wins Bronze at Paris Olympics 2024: कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे च्या कामगिरीवर PM Narendra Modi ते मध्य रेल्वे प्रशासनाकडून कौतुकचा वर्षाव!
स्वप्नील कुसळेने नेमबाजीमध्ये ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे या नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक्स मध्ये भारताला तिसरं मेडलं मिळवून दिले आहे. महाराष्ट्रासाठी स्वप्नीलचं हे यश खास आहे. कारण कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळवणारा स्वप्नील हा पहिलाच खेळाडू आहे. कोल्हापूरातील नेमबाज स्वप्नील हा मध्य रेल्वे मध्ये तिकीट तपासक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने देखील स्वप्नीलच्या कामगिरीवर आपण प्रचंड अभिमान बाळगतो असं म्हटलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
नरेंद्र मोदी यांची पोस्ट
मध्य रेल्वेची पोस्ट
अजित पवार
सतेज पाटील यांची पोस्ट
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे
खासदार धनंजय महाडिक