Hockey India: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी हॉकी संघाचे केले कौतुक, प्रत्येक सदस्याला बक्षीस म्हणून मिळणार इतके पैसे
रोमहर्षक फायनलमध्ये टीम इंडिया एका टप्प्यावर 3-1 ने पिछाडीवर होती, त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने एका मिनिटात दोन शानदार गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल करत टीम इंडियाने चौथ्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.
India Beat Malaysia: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी शनिवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Asian Champions Troph) अंतिम सामन्यात मलेशियाचा 4-3 असा (India Beat Malaysia) पराभव करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केले, तर हॉकी इंडियाने हॉकी संघाच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी 3 लाख रुपये देण्याची घोषणा केली. आणि स्टाफ कर्मचार्यांना रु. 1.50 लाख रोख बक्षीस जाहीर केले. रोमहर्षक फायनलमध्ये टीम इंडिया एका टप्प्यावर 3-1 ने पिछाडीवर होती, त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने एका मिनिटात दोन शानदार गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल करत टीम इंडियाने चौथ्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता टीम इंडिया सर्वाधिक चार वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा देश बनला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)