Women Maharashtra Kesari winner 2023: प्रतिक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी, सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा असं कर

सांगलीतील प्रतीक्षा बागडी आणि कल्याणमधील वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटीलला चितपट केले.

Pratiksha Bagadi

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत (Women Maharashtra Kesari ) सांगलीतील (Sangali) प्रतिक्षा बागडी (Pratiksha Bagadi) आणि कल्याणमधील वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे.या लढतीत प्रतिक्षाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला होता. वैष्णवीने देखील नंतर कुरघोडी करत सामना बरोबरीवर आणला होता. पण त्यानंतर प्रतिक्षाने मानेवर एकेरी डाव टाकला आणि वैष्णवीला चीतपट करत प्रथम महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. दरम्यान या विजयानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत प्रतिक्षाचे अभिनंदन करत पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement