Paris Olympics 2024: कुस्तीपटू अमन सेहरावतने उपांत्य फेरी गाठली, अल्बानियाच्या रेसलरचा केला पराभव

आता भारतीय वेळेनुसार रात्री 9.45 वाजता सेमीफायनलमध्ये अमन सेहरावतचा सामना जपानचा कुस्तीपटू रे हिगुचीशी होईल.

पॅरिस ऑलिम्पिकच्या कुस्ती सामन्यात भारताच्या अमन सेहरावतने उपांत्य फेरी गाठली आहे. अमनने अल्बेनियाच्या झालिमखान आबा करोवचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यांनी हा सामना 12-0 ने जिंकला. 57 किलो वजनी गटात अमनने पहिल्या फेरीत माजी युरोपियन चॅम्पियन व्लादिमीर एगोरॉफचा 10-0 असा पराभव केला होता. कुस्तीमध्ये भारताला अद्याप एकही पदक मिळालेले नाही. आता भारतीय वेळेनुसार रात्री 9.45 वाजता सेमीफायनलमध्ये अमन सेहरावतचा सामना जपानचा कुस्तीपटू रे हिगुचीशी होईल.

पाहा पोस्ट ृ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement