Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत Mirabai Chanu ने जिंकले सुवर्णपदक; PM Narendra Modi यांनी केले अभिनंदन
चानूच्या या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचे अभिनंदन केले आहे.
भारताची स्टार वेटफिल्टर मीराबाई चानू हिने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यावेळी 27 वर्षीय चानूने बर्मिंगहॅममधील तिचा ऑलिम्पिक विक्रमही सुधारला. तिने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले. चानूच्या या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचे अभिनंदन केले आहे. पीएमनरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे की, 'असामान्य मीराबाई चानूचा भारताला पुन्हा एकदा अभिमान आहे. बर्मिंगहॅम गेम्समध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. तिने नवीन राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केल्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद आहे. तिचे यश अनेक भारतीयांना, विशेषतः नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी आहे.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)