Diksha Dagar Accident in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान भारतासाठी वाईट बातमी! भारतीय खेळाडू दीक्षा डागरचा कार अपघात
हा अपघात झाला तेव्हा दीक्षाच्या कुटुंबातील 4 जण कारमध्ये प्रवास करत होते. हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील 23 वर्षीय दीक्षाने 2019 मध्ये तिच्या व्यावसायिक गोल्फ करिअरला सुरुवात केली.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारतीय गोल्फपटूंशी संबंधित एक वाईट बातमी समोर येत आहे. भारतीय गोल्फर दीक्षा डागर हिचा पॅरिसमध्ये अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षाचा मोठा अपघात झाला आहे. दिक्षाला कोणतीही गंभीर दुखापत नाही. मात्र तिच्या आईला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, दिक्षाचा अपघात 30 जुलै रोजी संध्याकाळी झाला होता. हा अपघात झाला तेव्हा दीक्षाच्या कुटुंबातील 4 जण कारमध्ये प्रवास करत होते. हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील 23 वर्षीय दीक्षाने 2019 मध्ये तिच्या व्यावसायिक गोल्फ करिअरला सुरुवात केली. जागतिक क्रमवारीच्या आधारे तिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोटा पद्धतीने थेट प्रवेश मिळाला होता. दिक्षा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने संयुक्तपणे 50 वे स्थान पटकावले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)