भारतीय फुटबॉलपटू Sunil Chhetri ठरला पुरुष आंतरराष्ट्रीयमध्ये तिसरी सर्वाधिक धावा करणारी व्यक्ती; PM Narendra Modi यांनी केले अभिनंदन

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत छेत्री सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सुनील छेत्री (Photo Credit: Twitter)

भारताचा महान फुटबॉलपटू आणि कर्णधार सुनील छेत्रीला फिफाकडून मोठा सन्मान मिळाला आहे. फुटबॉलची सर्वात मोठी प्रशासकीय संस्था फिफाने छेत्रीच्या शानदार कारकिर्दीवर एक विशेष माहितीपट बनवला आहे, ज्याचे नाव 'कॅप्टन फॅन्टास्टिक' आहे. बुधवारी (28 सप्टेंबर) हा माहितीपट प्रसिद्ध झाला. फिफा विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर माहितीपटाची माहिती देण्यात आली आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत छेत्री सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो 117 गोलांसह पहिल्या, तर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी 90 गोलांसह दुसऱ्या स्थानावर आहे. छेत्रीचे 84 गोल आहेत.

सुनील छेत्रीच्या या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. याबाबत एक ट्वीट करत पंतप्रधान म्हणतात, 'शाब्बास सुनील छेत्री! यामुळे भारतात फुटबॉलची लोकप्रियता नक्कीच वाढेल.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)