Hockey At Paris Olympic 2024 Live Streaming: आज हॉकीमध्ये भारताचा सामना होणार आयर्लंडशी, एका क्लिकवर येथे जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज हॉकीमध्ये आयर्लंडशी भिडणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4-1 ने पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनासोबत 1-1 अशी बरोबरी होती.

Hockey At Paris Olympic 2024 Live Streaming: आज हॉकीमध्ये भारताचा सामना होणार आयर्लंडशी, एका क्लिकवर येथे जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

Hockey At Paris Olympic 2024 Live Streaming: पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू झाले आहे. यासह अडीच आठवडे चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवाची सांगता रविवार, 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज हॉकीमध्ये आयर्लंडशी भिडणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4-1 ने पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनासोबत 1-1 अशी बरोबरी होती. आता भारत विरुद्ध आयर्लंड हॉकी सामना 30 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:45 वाजता सुरू होईल. ऑलिम्पिक हॉकी सामन्याचे थेट प्रक्षेपण Sports18 आणि Sports18 HD वर केले जाईल, त्यामुळे चाहते ते येथून पाहू शकतील. याशिवाय, त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावरही उपलब्ध असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2024 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).