सबसे आगे होंगे हिंदुस्तानी! Asian Games 2023 ला धमाकेदार सुरुवात, PM मोदींनी Video शेअर करत दिल्या शुभेच्छा

उद्घाटन समारंभात भारतीय संघाचे नेतृत्व महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी केले.

19व्या आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेला अधिकृत सुरुवात झाली आहे. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑगस्ट दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होत आहेत. उद्घाटन समारंभात भारतीय संघाचे नेतृत्व महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी केले.

आशियाई खेळ 2023 मध्ये भारतातून एकूण 655 खेळाडू सहभागी होत आहेत, जे आतापर्यंत देशातील सर्वात मोठे संघ आहे. एकूण 40 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आव्हान देतील.

पीएम मोदींनी उद्घाटन समारंभाचा व्हिडिओ शेअर केला आणि भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, 'मी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय दलाला शुभेच्छा देतो. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आम्ही आमची आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवल्यामुळे भारताची खेळाविषयीची आवड आणि वचनबद्धता दिसून येते. आशा आहे की आमचे खेळाडू चांगले खेळतील आणि खेळाचा खरा आत्मा काय आहे हे दाखवण्यासाठी कामगिरी करतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)