FIH Pro League 2024-25: महिला हॉकी संघ एफआयएच प्रो लीगमधून बाहेर; चीनकडून सलग 7 वा पराभव
FIH Pro League 2024-25: चीन बर्लिनकडून पराभव झाल्यानंतर महिला हॉकी संघ प्रो लीगमधून (FIH Pro League) बाहेर पडला आहे. शनिवारी चीनकडून 0-3 असा पराभव झाल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघ प्रो लीगमधून बाहेर पडला. या पराभवामुळे संघ टेबलच्या तळाशीच राहील हे निश्चित झाले आहे. युरोपियन टप्प्यात भारताचा हा सलग सातवा पराभव आहे. भारताचे 15 सामन्यांतून 10 गुण आहेत. संघ आज रविवारी पुन्हा लीगच्या शेवटच्या सामन्यात चीनविरुद्ध खेळेल. जरी भारताने शेवटच्या सामन्यात चीनला हरवले तरी त्यांचे फक्त 12 गुण होतील. चेन यांग (12 व्या मिनिटाला) आणि झांग यिंग (26 व्या मिनिटाला) यांनी पेनल्टी कॉर्नरवरून गोल केले तर अनहुल यू (45 व्या मिनिटाला) यांनी फील्ड गोल करून चीनला भारताविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवून दिला.
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement