FIFA World Cup Quarter-Finals: तब्बल 5 वेळा विश्वविजेता ब्राझील स्पर्धेतून बाहेर; क्रोएशियाने पेनल्टीवर केला 4-2 असा पराभव

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्कोअर लाइन 4-2 अशी राहिली.

Fifa World Cup

कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत पाचवेळा चॅम्पियन ब्राझीलचा पराभव झाला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जगातील नंबर-1 संघाचा पराभव केला. क्रोएशियाने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी ब्राझीलचा संघ सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडला. अशाप्रकारे फिफा विश्वचषक 2022 मध्ये सर्वात मोठा अपसेट पाहायला मिळाला. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाने ब्राझीलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये स्कोअर लाइन 4-2 अशी राहिली. ब्राझीलच्या रॉड्रिगो आणि मार्कोसची पेनल्टी हुकली. ब्राझीलचा गोलरक्षक एकही पेनल्टी वाचवू शकला नाही. क्रोएशियाने विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. आता त्यांची स्पर्धा नेदरलँड्स किंवा अर्जेंटिनाशी होईल.