Cristiano Ronaldo आता 2025 पर्यंत Saudi Arabianच्या 'या' क्लबमध्ये खेळताना दिसणार, चाहत्यांनी ट्विटरवर दिल्या प्रतिक्रिया
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल नसरमध्ये रोनाल्डोचा पगार दोन वर्षांसाठी $200 मिलियन असेल, म्हणजेच रोनाल्डोला एका वर्षात सुमारे 800 कोटी रुपये मिळू शकतात.
Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत 2023 पर्यंत खेळण्याचा करार केला आहे. या क्लबने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल नसरमध्ये रोनाल्डोचा पगार दोन वर्षांसाठी $200 मिलियन असेल, म्हणजेच रोनाल्डोला एका वर्षात सुमारे 800 कोटी रुपये मिळू शकतात. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत, रोनाल्डो स्पोर्टिंग लिस्बन, मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि जुव्हेंटस सारख्या काही महान क्लबसाठी खेळला आहे. आता अल नासर या यादीत सर्वात नवीन जोडले आहे. रोनाल्डोच्या या निर्णयानंतर चाहत्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)