Ronaldinho India Tour: रोनाल्डिन्हो ऑक्टोबरमध्ये कोलकात्याला भेट देणार, दुर्गा पूजा उत्सवात सहभाग घेणार
रोनाल्डिन्हो R10 फुटबॉल अकादमीला भेट देण्यासह अनेक सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभाग घेणार आहे
ब्राझिलियन आणि जागतिक फुटबॉलमधील एक दिग्गज, माजी FIFA विश्वचषक विजेता रोनाल्डिन्होने जाहीर केले आहे की तो ऑक्टोबर 2023 मध्ये भारताला भेट देणार आहे. तो एका कार्यक्रमाचा सहभाग घेणार आणि कोलकाता येथे दुर्गा पूजा 2023 उत्सवाताचा आनंद घेणार आहे. हा उत्सव 20 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे, 24 ऑक्टोबर रोजी विजया दशमी होणार आहे. तो त्याच्या R10 फुटबॉल अकादमीला भेट देण्यासह अनेक सेवाभावी उपक्रमांमध्ये भाग घेईल, जिथे तो मर्लिन राइज येथे मुलांशी संवाद साधेल आणि एका प्रदर्शनीय खेळात देखील खेळेल. .
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)