Commonwealth Games 2022: कोर्टाचा दरवाजा ठोठावणारी 19 वर्षीय TT खेळाडू दिया चितळेचा राष्ट्रकुल स्पर्धेच्या संघात समावेश

Birmingham CWG 2022: बर्मिंगहॅम येथे या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय टेबल टेनिस संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात दिया चितळेचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने दियाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुरुष संघात कोणताही बदल झालेला नाही.

टेबल टेनिस | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

भारताची टेबल टेनिस (Table Tennis) स्टार दिया चितळे (Diya Chitale) हिला तिला बर्मिंगहॅममधील स्पर्धेसाठी (Birmingham Games) संघात समाविष्ट करण्यात आले आहे. चितळेने 7 जून रोजी कॉमनवेल्थ गेम्सच्या संघातून वगळल्यानंतर नवी दिल्लीतील उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अर्चना कामथच्या जागी या तरुणीनीची निवड करण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now