Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजाची मोठी कामगिरी, महिला संघाने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये जिंकले रौप्यपदक
चीनने नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर कब्जा केला.
आशियाई खेळ 2023 मध्ये (Asian Games 2023) भारतीय नेमबाज वेगळ्या कामगिरी करत आहेत. नेमबाजीत भारत रोज एक ना एक पदक नक्कीच जिंकत आहे. असेच काहीसे शुक्रवारी सकाळी भारतीय महिला संघाने 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत रौप्यपदकावर कब्जा केला. महिला संघात ईशा सिंग, पलक आणि दिव्या सुब्बाराजू यांनी हा पराक्रम केला. भारतीय संघाने 1731 गुण मिळवले आणि ते चीनपेक्षा केवळ 5 गुणांनी मागे होते. चीनने नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर कब्जा केला. तर चायनीज तैपेईने 1723 गुणांसह कांस्यपदक जिंकून तिसरे स्थान पटकावले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)